निर्भीडसत्ता न्यूज –
मेढा / जावळी
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या दरे बुद्रुक शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात संघटनाचे काम सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणुन सातारा जिल्हाअध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांच्या पुढाकाराने दरे बुद्रुक येथे शाखा सुरू करण्यात आली.
गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात आणि जावळी तालुक्यात पक्ष विस्ताराचे कार्य सुरू आहे. त्यास गावागावातून कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चळवळीला बळकटी मिळू लागली आहे. असे मत या वेळी जावळी तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी व्यकत केले.
रोकडे पुढे म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी मेढा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. प्रशासकीय स्तरावर गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, पक्षातील पदाधिकारी, नागरिक या सर्वांच्या सहकायार्ने हा संकल्प तडीस नेणार आहे. हे या निमित्ताने आवर्जून नमूद करतो.
या कार्यक्रमास हेमंत गायकवाड (उपाध्यक्ष),जयसिंग रोकडे,बळवंत कांबळे, बळवंत बगाडे,विजय गंगावणे आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.जावळी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
संघटक जयसिंग रोकडे म्हणाले, तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी शाखा स्थापण्याचा झपाटा सुरू केला आहे. पक्षसंघटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह अन्य समाज घटकातील कार्यकतेर्ही पक्ष संघटनेत खांद्याला खांदा लावुन काम करण्याची तयारी दाखवु लागले आहेत. हे या अभिमनाने सांगावे वाटते.