निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे आज (रविवार, दि. 25) रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल गेले होते. त्यांचे निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
धुमाळ यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. तसेच ते पुणे जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्षपदावर कार्यरत होते. महाराष्ट्र रिक्षा सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. २०१२ ते १७ या दरम्यान ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक होते. तसेच त्यांनी ११ वर्षे पिंपरी -चिंचवड शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती.