निर्भीडसत्ता न्यूज –
28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी घर चलो अभियान राबविणार आहे. या कालावधीत घरोघरी जाऊन केंद्र, राज्य व मनपा यांच्या विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत.
याकरिता प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट घरोघरी जाऊन विकासभिमुख योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. घर चलो अभियनाचे माध्यमातून शहरामधील 1300 बूथचे मजबूतीकरण करण्याचा निर्धार शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी सर्व पक्ष पदाधिकारी व नगरसेवक यांना दिली आहे.
चलो अभियनाचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख समन्वक म्ह्णून जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच मंडलश: अमोल थोरात – प्राधिकरण चिंचवड, संजय मंगोडेकर – चिंचवड स्टे. दापोडी, बाबू नायर- किवळे थेरगाव, माऊली थोरात – सांगवी काळेवाडी, प्रमोद निसळ – निगडी चिखली, सारंग कामतेकर – भोसरी चर्होली, राजेश पिल्ले – युवा मोर्चा, उमा खापरे – महिला मोर्चा, सदाशिव खाडे – अनूसूचित, अल्पसंख्याक, व्यापार व कामगार, सचिन पटवर्धन – उर्वरित आघाड्या अशाप्रकारे विभागांचे समन्वक असणार आहेत.
घर चलो घर अभियनामध्ये खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, महेश कुलकर्णी, वसंत वाणी, अमर मुलचंदानी, यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी व नगरसेवक सामिल होणार आहेत.
भाजपचा येत्या ६ एप्रिलला वर्धापनदिन होणार आहे. तसेच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्याचे शहर पदाधिका-यांना उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती भाजप पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.