निर्भीडसत्ता न्यूज –
शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘बबन’या मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘ख्वाडा’या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा ‘बबन’चित्रपट शुक्रवारी राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिखली शरदनगर येथील अमृता विद्यालयात आठवी इयत्तेत असणारी जान्हवी कांबीकर हिने एमआयडीसीतील गरीब कामगार मुलीची भूमिका साकारली आहे. भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव हे मुख्य कलाकार आहेत.