निर्भीडसत्ता न्यूज –
तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी २०१८-१९ आर्थिक वर्षांचा ५२६२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.२७) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी दिलेल्या १ हजार ११२ उपसूचनांपैकी ग्राह्य ९८१ उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे.
महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर २० मार्च रोजी साडेसहा तास चर्चा झाली. त्यानंतर एकूण ६१६ कोटी रुपयांच्या १ हजार ११२ उपसूचना नगरसेवकांकडून देण्यात आल्या होत्या. त्यातून लेखा विभागाने ९९५ उपसूचना ग्राह्य ठरविल्या. तर, १४ उपसूचना अस्विकृत करून ९८१ ग्राह्य उपसूचनांसह महपालिका सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. दरम्यान, महापालिका प्रशासनाने टोकन तरतूद न ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, नगरसवेकांनी टोकन तरतुदीसाठी तब्बल ४४४ कामे उपसूचनांव्दारे अर्थसंकल्पात सुचविली आहेत. या कामासाठी शुन्य तरतूद अर्थसंकल्पात आहे.