निर्भीडसत्ता न्यूज –
वाकडमध्ये एकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आनंद यादव (वय ३५, रा. रिदम सोसायटी,वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहाच्या सुमारास वाकडे येथे राहत्या घरात भाऊ, वहिनी असताना आनंद यादव यांनी बाथरुममध्ये जाऊन गोळी झाडून आत्महत्या केली. त्याला तातडीने आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
ज्या बंदुकीतून त्याने गोळी झाडली ती त्याच्या वडिलांच्या नावावर आहे. आनंद यादवांचे वडील हे मुंबईत व्यवसाय करतात. आनंद हा आयटी इंजिनीअर होता. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याने डिप्रेशन थेरपी देखील घेतली होती. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.