निर्भीडसत्ता न्यूज –
सांगवी-रहाटणी-काळेवाडी मंडल भाजपाच्या वतीने घर चलो अभियानाचे पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत भावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
भाजप घर चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे.
यावेळी मंडलाचे अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, भाजप प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, नगरसेविका सविता खुळे, निर्मला कुटे, सीमा चौगुले, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, संकेत कुटे, श्रीराम कुटे, आदिती निकम, माधव मनोरे, राजू लोखंडे व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.