निर्भीडसत्ता – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णलयाचे विभागप्रमुखपद अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना देण्यात आले आहे. वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडून हा पदभार काढून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
डॉ. रॉय यांच्याकडून हा पदभार काढून घेण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. वायसीएम रुग्णालयाचे विभागप्रमुखपद काढून घेत ते डॉ. साळवे यांना देण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयाचे कामकाज यापुढे डॉ. साळवे यांच्या नियंत्रणाखाली येणार आहे. डॉ. रॉय पदोन्नती प्रकरण व नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर वादात सापडले आहेत.
या वादामुळे त्यांच्याकडून हा पदभार काढून घेत डॉ. साळवे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका सर्वसाधारण सभेने डॉ. साळवे यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपद देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यावर आणखी निर्णय झाला नाही. त्याबाबतचा निर्णय यानंतर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.