निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या अधिका-यांच्या विरोधात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ मे रोजी मध्यरात्री चिंचवडच्या मोहननगरमध्ये घडली.
सचिन उद्धव शिंदे (वय ३५, रा. चिखली) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे रात्री साडेबाराच्या सुमारास मोहनगर मधून जात असताना अज्ञात तिघांनी त्यांना अडवले. ‘तूच का सचिन शिंदे, तुला लय माज आला का, तूच महापालिकेच्या अधिका-यांच्या विरोधात कोर्टात केस केली आहे.’ असे म्हणून तिघांनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. पुढचा तपास पिंपरीचे पोलीस करीत आहेत.