निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील एक्स-रे मशीन बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने हे मशीन लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त वैघकीय अधिकारी डॉ. पवन साळवे याना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये खासगी ठिकाणी एक्स-रे काढण्यासाठी अधिक खर्च येतो. गरीब रुग्णाला तो खर्च परवडणारा नाही. मशीन बंद असल्यामुळे रुग्णाला त्रासाला सामोरे जावे लागते. त्यासाठी हि मशीन लवकर सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलना करू, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव, विघासागर गायकवाड, रुपेश कदम, दताराम साळवी, गोरखनाथ कवडे, चंद्रशेखर कणसे, कैलास कुदळे यांनी दिला.