निर्भीडसत्ता न्यूज –
आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन पहिल्यांदाच मराठीत होणार आहे. विशेष म्हणजे, ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि मराठी सिनेसृष्टीतला ‘चॉकलेट बॉय’ स्वप्निल जोशी हे समालोचनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
मराठी क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना आणखी खास असणार आहे. कारण, त्यांना सामन्याचे संपूर्ण वर्णन मायमराठीत ऐकायला मिळेल. मराठी माणसाचे आणि क्रिकेटचे एक वेगळेच नाते आहे. विजय मर्चंटपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकांनी महाराष्ट्र व मराठी माणसाला जगात सन्मान मिळवून दिला आहे. असे असले क्रिकेट समालोचनात मराठी क्वचितच दिसली आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात मात्र वेगळे चित्र दिसणार आहे.