26 मे ते 11 जूनला भाजपाचे संपर्क अभियान
निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र सरकार ४ वर्षे पूर्ती निमित्त २६ मे ते ११ जून या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी संपर्क अभियान राबविणार आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा ४ वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारच्या अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामन्यांना देणार आहेत. सदरच्या अभियानामध्ये राज्यातील मंत्री महोदयांचा सहभाग राहणार आहे. देशभरात १५ लाभार्थी योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑडियो कॉन्फरन्स व्दारा बोलणार आहेत.
याकरिता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट प्रबुध्द व्यक्तींशी संपर्क करून केंद्र सरकारच्या ४ वर्षाच्या उपलब्धीची माहिती, विविध प्रकारचे साहित्य नागरिकांना देणार आहेत. विधानसभा स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महापुरूषांचे पुतळे व परिसरात एक दिवसाचे स्वच्छता अभियान व महापुरूष पुजनांचे कार्यक्रम राबिवण्यात येणार आहेत. युवा मोर्चा द्वारा मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील वरिष्ठ नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे.
अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्दतीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संपर्क अभियनाचे माध्यमातून शहरामधील नागरिकांना केंद्र सरकारचा ४ वर्षाच्या कालावधीमधील सरकारच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्धार आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांना दिली आहे.
संपर्क अभियनाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख म्हणून आमदार लक्ष्मण जगताप पाहणार आहेत. विशेष संपर्क अभियानाचे संयोजक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा परिषदेचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे असणार आहेत. स्वच्छता अभियान – एकनाथ पवार, लाभार्थी संमेलन – गोपाळ माळेकर, पत्रकार परिषद – अमोल थोरात, बुध्दीजीवी संमेलन – सारंग कामतेकर, भारती चव्हाण व बाबू नायर, समरसता संपर्क – संजय मंगोडकर व मनोज तोरडमल, बाईक रॅली – राजेश पिल्ले व रवि लांडगे, वरिष्ठ नागरीक अभियान – महेश कुलकर्णी, बूथ संपर्क अभियान – अमोल थोरात अशाप्रकारे विभागांचे संयोजक असणार आहेत.