निर्भीडसत्ता न्यूज –
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सावरकर मंडळातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विधायक थोरात, मंडळाचे पदाधिकारी विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, प्रदीप पाटील, विश्वास करंदीकर, भाजपाचे पदाधिकारी अनुप मोरे, राजेंद्र बाबर, सलीम शिकलकर, दीपक नलावडे, रमेश बनगोंडे, महिला विभागाच्या पदाधिकारी सुमती कुलकर्णी, वैदेही पटवर्धन, शिल्पा बिबीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.