निर्भीडसत्ता न्यूज –
योगदान प्रतिष्ठाण व 7 ऑरेन्ज हॉस्पिटलतर्फे चिंचवडमधील महासाधु मोरया गोसावी स्टेडियम येथे आयोजित तीन दिवसीय मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगरसेवक राजेन्द्र गावडे, महाराष्ट्र विद्युत समिति सदस्य मधुकर बच्चे, भाजपा ज्येष्ठ नेत्या कांता मोंढे, इंद्रायणी बँकचे पोपट पवार, तात्या मुंजुगडे, पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंद, कैलाश राणे, हरिभाऊ मोहिते, बाबू गागरे आदी उपस्थित होते.
या तिन दिवसीय मोफत महाआरोग्य शिबिरात डॉ. मनोज नेनम, डॉ. राहुल त्रेहान, डॉ. शुभांगी पोळ आदि डॉक्टरांची टीम हिमोग्लिबिन, बिएमडि, रक्तदाब, ईसीजी अशा तपासण्या करणार आहे. त्याचा या भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन नगरसेवक सुरेश भोईर यांनी केले आहे.