गुन्हेगारांकडून १४ लाखांचा ऐवज जप्त: पिंपरी पोलिसांची कारवाई
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी गुन्हेगारांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखविला. पिंपरी पोलिसांनी कारवाई करून ९ सराईत गुन्हेगारांना गजाआड करत तब्बल १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून १४ लाख ७ हजार ७२५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदार नगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता. मुळशी), महेश शिवदास दिक्से (वय २८, रा. लोणी, ता. रिसोड, जि. वाशीम), सॅम्युअल उर्फ विशाल डेडली ऑरनॉल्ड (वय ३०, रा. संभाजीराव हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय २५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय २५, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव, काळेवाडी), राहुल श्रीहरी काळे (वय 34, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय १९, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय १९, भीमशक्ती नगर, स्पाईन रोड झोपडपट्टी, मोरेवस्ती चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी पोलिसांनी या वेगवेगळ्या कारवाया करून आरोपींना पकडले. त्या कारवाईत ११ तोळे ३ ग्रॅम सोने-चांदीचे दागिने २३ मोबाईल फोन, ३ देशी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ सेन्ट्रो कार, १ स्विफ्ट कार, १ करिझमा मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ७ हजार ७२५ रुपयांचा ऐवज या चोरट्यांकडून जप्त करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, हरिदास बोचरे, महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय ननवरे, पोलीस हवालदार शाकीर जिनेडी, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, जावेद पठाण, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, प्रवीण वाजे, पोलीस शिपाई दादा धस, निलेश भागवत, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, नितीन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, शैलेश मगर, सुहास डंगारे, स्वप्नील झनकर, नामदेव पोटकुले, शिवा भोपे, सोनवणे, म्हेत्रे, विकास रेड्डी, विद्यासागर भोते, महिला पोलीस शिपाई सुषमा पाटील यांनी ही कारवाई केली.