4
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे ६ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. वाय.सी.एम.हॉस्पिटल येथील यु.पी.एस. सिस्टीम (४ यु.पी.एस.) ची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे ४ लाख ७१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. वाय.सी.एम.हॉस्पिटल येथील चार टॉवर लिफ्टसचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी टॅक्ससहीत येणा-या सुमारे ८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ४१ भाटनगर येथे भाजी मंडई परिसरात काँक्रीटीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३२ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २५ मध्ये पेव्हींग ब्लॉक, गटर्स दुभाजक फुटपाथ व मनपा इमारतीची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४० लाख ९९ हजार रुपयांच्या
खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केंद्र शासनाचे धोरणानुसार सी.एस.आर ऍक्टीवीटी राबविण्यासाठी येणा-या सुमारे ७० हजार प्रतीमहा रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे वाय.सी.एम रुग्णालयाकडील विविध वार्डसाठी आवश्यक खुर्चा खरेदीकरण्यासाठी येणा-या सुमारे ५ लाख ८१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणे व लागवड करुन १ वर्ष देखभाल करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. वृक्षसंवर्धन विभागासाठी २ मीटर उंचीची वृक्षारोपणाची मोठी रोपे खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे ३२ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. ब प्रभागातील ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी ६० लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. चोविसावाडी शाळा व यंशवतनगर शाळेतील विद्यार्थी वाहतुकीसाठी करण्यासाठी येणा-या सुमारे १२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.