घर, वॉर्ड आणि पालिकेची तिजोरी सांभाळत दिली दहावीची परिक्षा
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड दहावीची परीक्षा ५५ टक्क्यांनी उतीर्ण झाल्या आहेत. २६ वर्षांच्या ममता गायकवाड विवाहित आहेत. लग्नापूर्वी त्यांनी ममता पवार या नावाने परीक्षा दिली होती. आपले घर, वॉर्ड आणि स्थायी समितीचा कारभार सांभाळत त्यांनी परिक्षा दिल्याने त्यांचे कौतुक होत ठआहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत महिला आरक्षण पडल्याने,पती माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पत्नीला पहिल्यांदाच रिंगणात उतरवलं.त्या बहुमतानी निवडून आल्या.विनायक गायकवाड यांनी स्थायीच्या खुर्चीवर बसण्याचा चंग बांधला होता.पण पत्नीचे शिक्षण आठवीच्या पुढे न झाल्याने, त्यांनी १७ नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचं वेळापत्रक आले अन दरम्यान, मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू झाली.
यात पक्षाने ममता गायकवाड यांचे नाव पुढे केले, सभापती म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आले. स्थायीच्या चाव्या त्यांच्या हातात आल्या. आणि त्याच वेळेत परीक्षा देखील झाली.परीक्षेत त्यांना पंचावन्न टक्के गुण मिळाले. मात्र, जीव भांड्यात पडला. ममता गायकवाड यांना मराठीत ३८, हिंदी मध्ये ३९ गुण मिळाले आहेत. परंतु स्थायी समितीचे गणित हाताळणाऱ्या अध्यक्षा ममता गायकवाड यांना ५९ गुण मिळाल्याने त्या समाधानी असल्याची चर्चा आहे.