निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेसपर्यत रस्त्याचे ‘कै. उमेश जोगळेकर पथ’ असे, तर उमा प्लास्टिक कँपनी समोरील चौकाचे उद्योजक कै. बळवंत जेजुरीकर चौक असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावर रविवारी (दि.१०) अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपचे जेष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक केशव घोळवे, शैलेश मोरे, बाबू नायर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, अमित गोरखे, सुनील कदम, राजू सावंत सौ. पानसरे, निहाल पानसरे,अण्णा लुकर, अमित गोरखे, महापालिकेचे अधिकारी शेखर साळवी, दीपक भोजने आदी उपस्थित होते.