निर्भीडसत्ता न्यूज –
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय, नागपुरातील दिघोरी येथे भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची आज पहाटे हत्या करण्यात आली आहे. नागपूरमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधान आलय.
दरम्यान पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर, वय ५१ वर्ष, वंदना पोहनकर, वय ४० वर्ष, वेदानी पोहनकर, वय १२ वर्ष, मीराबाई पोहनकर, वय ७२ वर्ष, कृष्णा पालटकर, वय २ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.
कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.