निर्भीडसत्ता न्यूज –
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन व शारंगधर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वाकडमधील कावेरीनगर परिसरातील पोलीस लाईन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष गजानन चिंचवडे, वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, हरीष मोरे, डॉ. गौरी अभ्यंकर, डॉ. विजय पुरा, डॉ. रश्मी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी अतुल राऊत, शुभम चिंचवडे, युवराज चिंचवडे, किरण गांधी, तेजस खेडेकर, सहदेव गायकवाड, जनक ठक्कर, प्रमोद नेवे, मंगेश शेलार, वैभव घोटकुले, विशाल तांबे, कानजी चौधरी आदींनी संयोजन केले.