निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पहाता ठिकठिकाणी स्वच्छतागृह आसणे गरजेचे आहे. त्यानुसार महापालिका महिलांसाठी शहराच्या काही भागात “ई-टॉयलेट” सुरु करणार आहे. पिंपळेसौदागरमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या या सुविधेसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही सुविधा महिला व पुरुषांसाठीही सुरू करावी आणि ती निशुल्क असावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, कोकणे चौकात महापालिका व समटेक क्लिन अँड क्लिअर सिस्टीमच्या वतीने ई टॉयलेट प्रलकप राबविला जाणार आहे . सध्या हा प्रकल्प महिलांसाठी सुरु करण्यात येत असून यासाठी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हात धुण्यासाठी साबण, हात धुतल्यानंतर ते सुकविण्यासाठी हॅन्ड ड्रायर मशीन, टाच फ्री टेप, सॅनेटरी नॅपकिन डिस्पोझरया सांरख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित आहे.
त्यामुळे स्वच्छता राहण्यास मदत होणार असले तरी जे नागरिक वर्षाला हजारो रुपये कराच्या स्वरूपात मलप्रवाह सुविधा लाभकार भरूनही स्वच्छतागृहांसाठी आगाऊ पाच रुपये का भरावेत हा खरा प्रश्न आहे. शुल्क भरून स्वच्छतागृहांचा वापर म्हणजे नागरिकांना पुन्हा आर्थिक भुरदंड आहे. हा प्रकल्प राबवायचा असेल तर महिला व पुरुषांसाठी निशुल्क इ टॉयलेट उभारावेत. कोकणे चौकात लिनिअर गार्डनमध्ये किमान तीन ई टॉयलेट असावेत अन्यथा एकही ई टॉयलेट बसवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.