निर्भीडसत्ता न्यूज –
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आणि क्रांतीकारकांचे विचार, विज्ञान याची माहिती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांना क्रांतीकारकांची माहिती असलेली, विज्ञानाची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तब्बल दोन हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
मोहननगर, येथील क्रांतीवीर सावित्री फुले संस्थेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.19) 200 पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये क्रांतीकारक यांची माहिती असलेले पुस्तके, वैज्ञानानिक माहिती, गमती-जमती, गोष्टीच्या पुस्तकेच देण्यात आली आहेत. यावेळी रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षा उज्ज्वला जोशी, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबाळकर, मारुती बहिरवाडे आदी उपस्थित होते.
रवी नामदे म्हणाले, ”क्रांतीकारांना देशासाठी बलिदान दिले आहे. या क्रांतीकारकांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. त्याचबरोबर विज्ञानाची देखील माहिती होणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबतर्फे दोन हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. याबरोबच विद्यार्थ्यांना शाळेची गोडावी लागासाठी गमती-जमती, गोष्टींच्या पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले आहे.