निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व प्राईम प्लस सोसायटीच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये विविध भागात शनिवारी (दि. २३) वृक्षारोपण करण्यात आले.
प्राईम सोसायटीचे चेअरमन पंकज भाकरे, संजय सावंत, आशिष पाटील, गोल्डी दत्ता, प्रणय शहा, संजय सिनकर, अमरेंद्र कुलकर्णी, रेमू कौल, अंजली भाकरे, कोडमलवार, देवरे आदी या वेळी उपस्थित होते.
आपला परिसर सुंदर व हिरवामय दिसावा या उद्देशाने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चार जणांच्या कुटुबांसाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. त्यामुळे वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा. तसेच लहान मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करावी.
नाना काटे
नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका