निर्भीडसत्ता न्यूज –
आंदर मावळातील परिटेवाडी इंगळून या गावातील शेतक-यांना ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडमुळे मोठा आधार मिळाला आहे. येथील १०० एकर जमिनीला वर्षभर पाणीपुरवठा करणारा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजपुरकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या माजी अध्यक्षा रेणू मित्रा, जयश्री कुलकर्णी, प्रणिता अलुरकर, साधना काळभोर, आरती मुळे, सदस्य आशा चौधरी, गुरुदेवी शेट्टी, सुजाता ढमाले, प्रतिभा दलाल, रोटरीयन रवी राजपुरकर, विजय काळभोर, मुकुंद मुळे, सुहास ढमाले, संजीव आलूरकर, गुरुदिप सिंह, निर्मल कौर, ईनरव्हील क्लब जेनेक्स अध्यक्ष संजुश्री मुनोत, मावळ विकास समितीचे अध्यक्ष भांगरे, संस्थापक बबन बाधाले यांच्यासह सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.
आंदर मावळातील परिटेवाडी इंगळून या गावात १४७ कुटुंब रहतात. मात्र, या भागामध्ये केवळ पावसावर अवलंबून एखादे पीक घेता येत होते. त्या ठिकाणी जवळ असलेल्या टाटाच्या धरणामधून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून वर्षभर १०० एकर जमिनीला पाणी मिळेल, ही सुविधा उपलब्ध करून देणारा प्रकल्प ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने राबविण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पाला मावळ विकास समिती आणि बल्क कंटेनर या कंपनीकडून सीएसआरमधून अर्थसाहाय्य मिळाले. तसेच, गावक-यांनही हा प्रकल्प राबविण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हातभार लावला. गावक-यांच्या भविष्यासाठी उत्कृष्ट प्रकल्प साकार झाल्याने त्यांच्याकडून यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.