सर्वेक्षणात पुणे 10 व्या, तर पिंपरी-चिंचवड 43 व्या क्रमांकावर
निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला 10 व्या, पिंपरी-चिंचवड शहराला 43 व्या क्रमांकाचे “रॅंकिंग’ मिळाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा पुणे शहर अधिक स्वच्छ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका व नागरिकांना स्वच्छतेसाठी टआणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
मागील वर्षी (2017-18) मध्ये पिंपरी महापालिका 72 व्या क्रमांकावर होती. या वर्षी मात्र हे रॅंकिंग 29 ने वधारले असल्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे. मात्र, पुणे महापालिकेने बाजी मारली असून टॉप टेनमध्ये शिरकाव केला. तर, पिंपरी-चिंचवड पुण्याच्या तुलनेने मागे पडले आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातील नवी मुंबई नवव्या क्रमांकावर आहे