निर्भीडसत्ता न्यूज –
कौटुंबिक वादातून एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आहे. ही घटना आज सोमवारी (दि.२५) सकाळी वाकड येथून उघडकीस आली.
अविनाश संभाजी पवार (वय ३५, रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या व्यक्तीस त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.