निर्भीडसत्ता न्यूज –
राजर्षी छत्रपती शाहूंचे विचार व त्यांच्या कार्याचा वारसा पोहोचविण्यासाठी ‘शाहू’ विचार सर्वानी सक्रिय केले पाहिजेत. वर्षातून जयंती किंवा पुण्यतीथीपुरती शाहूंची आठवण न काढता वर्षभर शाहू कार्याचा जागर झाला पाहिजे असे प्रतिपादन महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सवा प्रसंगी ते बोलत होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आयोजित प्रबोधन पर्वाचा समारोप महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत झाला. चिंचवड येथील संभाजीनगर साई उद्यानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या मंगला कदम, नगरसदस्य तुषार हिंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, उद्योजक शिवाजी शिऊडकर तसेच कोल्हापूर जिल्हा मिञ मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, विजय नाळे, शाहीर प्रकाश ढवळे, नामदेव शिंञे,मिलिंद वेल्हाळ, जगदीश परीट, सुनील पाटील, महादेव बुजरे,शिवाजी पाटील, जयसिंग पवारआदी मान्यवर, परिसरातील नागरिक या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता रंग मराठी, ढंग मराठी या कार्यक्रमाने झाली. शाहीर सुरेश सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा शाहिरीचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका मंगला कदम यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले, आभार नामदेव शिंत्रे यांनी मानले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ व ”आरंभ सोशल फौंडेशन” यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक तुषार हिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.