निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रहाटणी येथे दीड गुंठा (1500 चौरस फूट) जागा विकत घेतली होती. मात्र, राजकीय वरहस्त असल्यामुळे काही व्यक्तींनी ती बळकावली असल्याचा आरोप राणी शेळके या महिलेने पत्रकार परिषदेत केला आहे.
राणी शेळके यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रहाटणी येथे सर्व्हे नं – 18, हिस्सा नं 3/1 (जुना सर्वे नं 18/3) एकूण 1500 चौरस फूट जागा 2015 मध्ये विकत घेतली होती. जागा विकत घेतल्याचे खरेदीखत व इतर कागदपत्रे राणी शेळके यांच्याकडे आहेत. ही जागा त्यांचीच असल्याचे पुरावे असताना काही लोकांकडून ही जागा बळकाविण्यात आली. ही महिला निराधार असल्याने त्या जागेचा ताबा महिलेला घेऊ दिला जात नाही.
या प्रकरणाबाबत महिलेने पत्रकार परिषद घेऊन राजकीय वरदहस्त असल्याने संबधित व्यक्तीकडून माझी जागा असून तिचा ताबा घेऊ दिला जात नाही. मला एक एक अपंग मुलगी असून हक्काची जागा मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पोलीस व महापालिका प्रशासनाने लक्ष घालून या जागेवर मला ताबा मिळवून द्यावा, अशी मागणी राणी शेळके यांनी केली आहे.