निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी येथे बुद्ध विहाराशेजारील मोकळ्या जागेमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले.
उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माई काटे, माजी नगरसेवक विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राउत, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, सुनील नरोटे, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.