निर्भीडसत्ता न्यूज –
औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जगन्नाथ सोनावणे ( वय. ५५ वर्ष ) यांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, सोनवणे यांचे रात्री 3 च्या सुमारास निधन झाले. काल महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर देवगाव रंगारी येथे आंदोलन करण्यात येत होते, यावेळी सोनावणे यांनी विष प्राशन केले होते.
दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे यांच्या मृत्युच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, त्यानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात दुसरा बळी गेला आहे. दरम्यान, जगन्नाथ सोनवणे यांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून मृतदेह घेऊन कुटुंबीय गावाकडे रवाना झाले. यानंतर आंदोलन आणखीनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.