निर्भीडसत्ता न्यूज –
मेढा : जावली
मेढा- येथील आगाराची एस टी बस क्रमांक एम एच ४० एन ९४३७ ही सातारा कण्हेर मार्गे मेढा येथे पाचच्या दरम्यान आली. या बसमधून प्रवास करणारी बालगोपाळ वस्ती जवळवाडी येथे राहणारी महिला व तिची मुलगी मेढा येथे उतरुन एसटी समोरूनच जात असताना माय लेकींचा पुढच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, शालीनी रामू चव्हाण वय 3५ व तिची मुलगी अंजली रामू चव्हाण वय तीन अशी माया लेकींची नावे आहेत. हा अपघात मेढयाच्या बाजार चौकालगत जुन्या बस थांब्यावर झाला. सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. एस टी बस चालक दादासो जाधव हे मेढा पोलिस स्टेशनला हजर झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.