निर्भीडसत्ता न्यूज –
नागरिकांच्या तक्रारींवर यापुढे १२० टक्के कारवाई करण्यात येईल असा सक्त निरोप शहराच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिला. तसेच त्यांनी तक्रारींसाठी 8975283100 व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केेेेला.
शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग ची समस्या, दिवसेंदिवस वाढत चाललेले गुन्हे यामध्ये घरफोड्या, वाहनांची चोरी, सायबर क्राईम, पीएमपीएल बसेसची झालेली दुरावस्था यासारख्या समस्यांचा विचार करावा असे पत्रकारांनी यावेळी सुचवले. चांगल्या लोकांच्या मदतीने पुण्यातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन डॉ .के व्यंकटेशम यांनी दिले.