निर्भीडसत्ता न्यूज –
व्हायोलिनच्या सुरावटी मधून एका पेक्षा एक सरस भावगीते, नाट्यगीते,चित्रपट गीतांनी चारुशीला गोसावी प्रस्तुत ‘ व्हायोलीन गाते तेव्हा ‘ ही मैफल संस्मरणीय ठरली.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ही मैफल आयोजित करण्यात आली होती.
सुगम संगीत, भावगीते, नाट्यगीते,चित्रपट संगीत आणि जुन्या मराठी – हिंदी संगीताची ही सुरेल मैफल रसिकांसाठी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आली होती.
‘निज रुप दाखवा ‘ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. ‘थकलेले रे नंदलाला ‘, ‘धुंद मधुमती ‘, ‘ कशी करू स्वागता ‘, ‘ असा बेभान हा वारा ‘,ही गीते ‘ गुंतता हृदय हे ‘ , ‘ विकल मन ‘ सारखी नाटयपदे ,’ का हो धरिला मजवरी राग ‘ , ” बुगडी माझी ‘ सारख्या लावण्या सादर करण्यात आल्या.
हिंदीतील ‘ आईए मेहरबान ‘,’ निगाहे मिलाने को ‘,’ मधूबन में राधिका ‘ सारखी अवीट चालीची गीते व्हायोलिनच्या सुरावटीमधून सादर करण्यात आली.
डॉ. राजेंद्र दूरकर (तबला), अमृता ठाकूरदेसाई (सिंथेसायझर), राजेंद्र साळुंके (ताल वाद्ये) यांनी साथसंगत केली. राजेंद्र गोसावी यांनी निवेदन केले. भारतीय विद्या भवन ‘ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.