सांगली, सातारा, पुणे येथे पोलिसांची कारवाही
निर्भीडसत्ता न्यूज –
हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणी सुधन्वा गोंधळेकर, आणि शरद कळसकर यांना देखील अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तब्बल दहा पिस्तूले, गावठी कट्टा, चाकू आणि चॉपर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोंधळेकर पुण्यात ग्राफिक डिझायनर
सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा साताऱ्यातील असून तो सातारा शहरातील करंजे परिसरात राहतो. त्याचे लग्न झालेले आहे. त्याला दोन लहान मुली असून त्याचा लहान भाऊ पुण्यात आयटी क्षेत्रात शिक्षण घेतोय. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.
होणार चौकशी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अनुषंगाने राऊत, कळसकर, गोंधळेकर यांची चौकशी केली जाणार आहे.