निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पोलिसांच्या कोणत्याही मदतीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करावा लागणार आहे.
नागरिकांना संकटसमयी तसेच पोलिसांच्या मदतीसाठी १०० या क्रमांकाबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे संपर्क क्रमांक
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे कार्यालय – 020 – 2745 0444 / 2745 0555
अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय – 020 – 2745 0125
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक व दोन) – 020 – 2748 7777
नियंत्रण कक्ष –020 – 2745 0121020 – 2745 0122020 – 2745 0666020 – 2745 0888020 – 2745 8900020 – 2745 8901