निर्भीडसत्ता न्यूज –
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरीतील राष्ट्रतेज मित्र मंडळाच्या वतीने जावळी तर्फ कुडाळ येथील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे प्रवीण वालीवडे, विशाल शिंगाटे, जीवन राऊत, अजय पाताडे, वासुदेव जोशी, संतोष कुंभार यांच्या समनवयाने या साहित्य वाटप करण्यात आले.
मंडळाच्या वतीने या शाळेतील ८० मुलांना बॅग, वह्या, पाटी इत्यादी साहित्य वाटण्यात आले. मागील वर्षी देखील मंडळाने सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अशाच प्रकारचे साहित्य वाटण्यात आले होते.
आपण देखील या समाजाचा एक घटक आहोत. त्यामुळे या समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने अशा संस्थांना मदतीचा हात द्यायला हवा. विविध सण-उत्सवांचे औचित्य साधून संस्थेला मदत करायला हवी. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्धल परिसरातून स्वागत केले जात आहे.