दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करा; तालुका शिवसेनेचे प्रशासनास अल्टीमेटम
मुळशी ग्रामीण : प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
मागील काही महिन्यापुर्वीच सुमारे दहा कोटी रूपये खर्च करूण हिंजवडी – माण रस्ता बनवण्यात आला, मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची चाळण झाली असून जागोजागी रस्ता खचून सर्वत्र खड्डे पडले आहेत तसेच तालुक्यातील अनेक रस्त्यांची सुद्धा खड्ड्यांमुळे अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वरिष्ठा मार्फत या निकृष्ठ कामाची चौकशी करण्यात यावी व रस्ते ताबडतोब डागडूजी करूण पुर्वरत करण्यात यावेत अशी मागणी मुळशी तालुका शिवसेनेच्या वतिने करण्यात आली आहे.
तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांच्या समवेत उपतालुका प्रमुख संतोष बुचडे , दिलीप गुरव , युवासेना उप जिल्हा अधिकारी सचिन खैरे , विभाग प्रमुख सचिन पळसकर , नागेश साखरे , विश्वनाथ विर , पांडूरंग निवेकर , नितिन साखरे , रितेश साखरे , नितिन लोयरे, श्रिकांत बुचडे, पंकज साखरे व शिवसैनिक या वेळी उपस्थीत होते.
शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांनी नुकतीच पदाधिकार्यां समवेत मुळशीतील पौड येथे सार्वजनीक बांधकाम विभागातील अधिकार्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मुळशी तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे झालेली दयणीय अवस्था याबाबत चर्चा करूण निवेदन दिले. तालुक्यात वाहनचालकांना ये जा करताना अक्षरश: जीव मुठीत धरूण प्रवास करावा लागत आहे तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे कोट्यावधी रूपये खर्च करूण नुकतीच पुर्ण करण्यात आली.
पहिल्याच पावसात सर्वत्र खड्डे पडले असून रस्त्यांचे तिन तेरा वाजले आहेत तसेच राज्य महामार्ग क्रमांक 65, पुणे कोलाड हा रस्ता सुद्धा नुकताच बनवन्यात आला परंतू या रस्त्यावर वारक ते चाचावली गावा दरम्यान मोठ मोठे खड्डे पडले आहेत ही अत्यंत गंभिर बाब असून याची वरिष्ठामार्फत चौकशी करण्यात यावी तसेच रस्त्यांची ताबडतोब डागडुजी करूण खड्डे बुजवण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.
एकंदरीतच तालुक्यातील खराब रस्त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाची उदासीनता कारणीभुत असून याचा नाहक त्रास मात्र सर्व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे.
दरम्यान, रस्ता तयार करणार्या संबधीत ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी तसेच खराब रस्त्यांची डागडूजी करूण खड्डे ताबडतोब बुजवण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा सुचक ईशारा तालुका शिवसेने कडून निवेदना मार्फत तालुका देण्यात आला आहे.