शाहूपुरी पोलिसांनी 7200 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी केल्या हस्तगत
निर्भीडसत्ता न्यूज –
सातारा येथील भूविकास बॅंक चौकात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेला चोरटा आसिफ अयुब शेख (रा. सरताळे, ता. जावली) हा मेकॅनिक निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्याच्याकडून स.पो.नि विठ्ठल शेलार यांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
भूविकास चौकातील हॉटेल आंबेसेडर परिसरात विनायक मानवी हे वाहतूक नियमन करत असताना शेख एका दुचाकीचे लॉक तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यावेळी त्यांनी त्याला हटकले. तेव्हा त्याने धूम ठोकली होती. यावेळी विनायक मानवी यांनी शेखला पाठलाग करून पकडले. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने आणखी काही गाड्या चोरल्याची कबुली दिली होती.
शेख याने आपण दुचाकी गॅरेज मध्ये काम करत असून हौस म्हणून पाच गाड्या चोरल्याचे कबुल केले. त्यानंतर त्याने चोरलेल्या गाड्या सरताळे, वाई भागात लपवल्याचे सांगिलते होते.
दरम्यान स.पो.नि शेलार व पथकाने वाई भागात जात चोरलेल्या दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईत सहभाग घेतलेल्या स.पो.नि शेलार, हसन तडवी, पो.ना. प्रविण गोरे, लैलेश फडतरे, अधिक खरमाटे, संतोष लेंभे, अमित माने,स्वप्नील कुंभार, मोहन पवार ओंकार यादव, मनोहर वाघमळे यांचे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने, पो.नि. किशोर धुमाळ यांनी अभिनंदन केले.