मुळशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुळशी ग्रामिण : प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेनेकडून संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या शिवसेना संपर्क मोहीम अभियानाला सुरवात झाली असून जिल्ह्यातील ग्रामिण भागात सकारात्मक प्रतिसाद पहायला मिळत आहे. मुळशी तालुक्यातील ग्रामिण भागात मुठा खोर्यातील अनेक दिग्गज आजी माजी सरपंच, उपसरपंच पदाधिकार्यांचा शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या उपस्थीत हा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.
पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, उपजिल्हा प्रमुख बबनराव दगडे, मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, शिवसहकार जिल्हा संघटक बाळासाहेब भांडे , युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, उपजिल्हाधिकारी सचिन खैरे, शिवसेना समन्वयक कैलास मारणे, स्थानिक लोकाधिकार समिती जिल्हा अध्यक्ष सुरेश मारणे, नाना मरगळे, शिवाजी उभे , रामचंद्र काळोखे आदी या वेळीउपस्थीत होते.
जिल्ह्यातील वरिष्ठ नेते सत्यवान उभे यांच्या प्रमुख उपस्थीत मुठा खोर्यातील विद्यमान उपसरपंच अजय शेडगे, अंकुश शेडगे, अभिजीत कांबळे, सागर राठोड, राजेंन्द्र मारणे, बाळासाहेब मारणे, विजय मारणे यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
मुठा खोर्यातील अनेकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने ग्रामीण भागात सेना अजून बळकट झाली असून शिवसंपर्क मोहीमेला ग्रामिण भागात चांगले यश मिळत आहे तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी , विविध पक्षाचे सदस्य आजी – माजी सरपंच , उपसरपंच संपर्कात असून लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शना नुसार योग्यवेळी त्यांचाही प्रवेश करण्यात येईल असा विश्वास शिवसेनेचे मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.