निर्भीडसत्ता न्यूज –
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे आज हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. दिल्लीमधील चाणक्यपुरीस्थित प्राईमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामत यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे.
गुरुदास कामत यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात २००९-११ या काळात गृह मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री होते. कामत यांनी गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन-दीव या राज्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे.