निर्भीड न्यूज –
जावली तालुक्यातील मेढा गावच्या नजीक मालदेव घाटात कुडाळ हुन मेढ्याकडे निघालेला डप्पर चालकाचा ताबा सुटल्याने २०० फुट दरीत कोसळला. या अपघातात डप्परचा चालक राजेंद्र पोफळे जागीच ठार झाला.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार कुडाळहुन मेढ्याकडे मातीची वाहतुक करण्यासाठी निघालेला डप्पर क्रमांक एम एच ११ए एल ७५७७ मालदेव घाटातील तीव्र वळणावर गाडीवरचा ताबा सुटल्याने २००फुट दरीत कोसळला. या अपघातात डप्परचा चालक राजेंद्र पोफळे रा वालुथ हा जागीच ठार झाला.
दरम्यान मालदेव घाट हा तीव्र वळणाचा असुन देखील नेहमीप्रमाणे गांधारीच्या भुमीका बजावणार्या सार्वजनिक बाधकांम विभाग मालदेव घाटात संरक्षण कठडे अजुन किती जीव गेल्यावर बांधणार असा संतप्त सवाल जनतेमधुन व्यक्त होताना घटनास्थळी दिसत होता.
अधिक तपास सहाय्यक फौजदार शेडगे करत आहेत.