निर्भीड न्यूज –
भोसरी येथील जय गणेश साम्राज्य येथून विविध मार्गांवर पीएमपीएमएलच्या बस सुरू करण्यात याव़यात; तसेच ठिकठिकाणी बसथांबे उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनपा पार्टीच्या महिला मोर्चाच्या शहर चिटणीस जयश्री लहरीया यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना लहरीया यांनी याबाबत निवेदन दिले. स्वरुपा मैंदर्गी, श्वेता शेगावकर, प्राची कामत, पवनदीप संधू आदी या वेळी उपस्थित होत्या. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भोसरी येथील जय गणेश साम्राज्य येथून शहरातील विविध भागात जाण्यासाठी थेट बस सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्व प्रवाशांचे हाल होतात. बस नसल्याने रिक्षा किंवा अन्य वाहनांवर अवलंबून रहावे लागते. रात्री तसेच वेळोवेळी येथील प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक होते. प्रवाशांना याचा आर्थिक; तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो.
प्रवाशांची ही समस्या सोडविण्यात यावी. त्यासाठी जय गणेश साम्राज्य येथून शहरातील विविध भागात बस सुरू होणे आवश्यक आहे.
ते राजमाता जिजाऊ चौक, उड्डाणपूल (स्पाईन रोड) बसथांबे आणि बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जय गणेश साम्राज्य ते राजमाता जिजाऊ चौक, जय गणेश साम्राज्य ते राजमाता जिजाऊ चौक – वल्लभनगर, जय गणेश साम्राज्य ते राजमाता जिजाऊ चौक, घरकुल, कृष्णानगर, निगडी या मार्गांवर पीएमपीएमएल बस सुरू करण्यात याव्यात.
सेक्टर क्रमांक 13 तुळशी लँड मार्क शेजारी, सेक्टर क्रमांक नऊ आणि दहा, स्पाईन सिटी चौक, सेक्टर क्रमांक चार संतनगर चौक, ज्ञानेश्वर हॉस्पिटलसमोर, जय गणेश साम्राज्यसमोर, राजमाता जिजाऊ चौक आदी ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा, अशी मागणी लहरीया यांनी निवेदनातून केली आहे.