निर्भीड न्यूज –
चिंचवड येथील पोलीस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष गजानन चिंचवडे यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पिंपरीतील संततुकाराम येथील आचार्य अत्रे सभागृह येथे पुरस्कार देण्यात आला. सुमित ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक रवींद्र पोमण आणि पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे व्यवस्थापक डॉ. विवेक क्षीरसागर यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम चिंचवडे यांनी शहरात राबविले याचीच पावती म्हणून ह्या वर्षीचा “राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार” त्यांना देण्यात आला.