निर्भीडसत्ता न्यूज –
महानगरपालिका निवडणूकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवक पद रद्द करा, असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने नुकतेच दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानूसार पिंपरी चिंचवड महापालिकेतील चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. याबाबत महापालिकेतील निवडणूक विभागाने नगरविकास विभागाकडे चारही नगरसेवकांचा अहवाल सादर केला असून यासंर्दभात ते काय निर्णय घेतात, याकडे आयुक्तांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणूकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्यांना सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सादर न करणा-या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्यानूसार कोल्हापूर महापालिकेत तब्बल 19 नगरसेवकांना पद गमावावे लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 64 नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. यातील 22 नगरसेवकांनी जुलै महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले. त्यानूसार एकूण 60 नगरसेवकांनी हे प्रमाणपत्र सादर केले. परंतू, दोन नगरसेवकांनी सहा महिन्यांची मुदतबाह्य प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर 2 नगरसेवकांनी प्रमाणपत्र जमा केलेले नाही.
यामध्ये भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड ( प्रभाग-1 , चिखली), नगरसेविका यशोदा बोईनवाड (प्रभाग-6, धावडे वस्ती-भोसरी) यांनी अजूनही जात पडताळणी प्रमाणपत्र महापालिकेकडे दाखल केलेले नाही. तर भाजप नगरसेविका मनीषा पवार (प्रभाग 23, थेरगाव) आणि कमल घोलप (प्रभाग 13, निगडी) या दोघींचे जात पडताळणी प्रमाणपत्र हे महापालिका निवडणूक विभागाकडे आयोगाने जात पडताळणीस सहा महिने दिलेल्या मुदतीनंतर सादर केलेले आहे.