निर्भीडसत्ता न्यूज –
भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षक पदी सम्यक विदयार्थी आंदोलन पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे. राज्यातील 31 जिल्हा निरीक्षक व संपर्क प्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी आर टी ई अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकांना 25 टक्के राखीव कोट्यातुन शाळेमध्ये प्रवेश देण्या बाबत जनजागृती करून महत्व पटवून दिलेले आहे. मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व परीक्षा फी परताव्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील शालेय मुलींना-मुलांना मोफत दप्तर वाटप , वह्या वाटप असे शालेय साहित्य दरवर्षी मोफत देतात. भारतीय संविधान जनजागृतीसाठी शालेयस्तरावर भारतीय संविधान पुस्तकांचे वाटप करतात.
यासह विविध उपक्रमाअंतर्गत विदयार्थी चळवळ सुरु ठेवली आहे. समाजातील विध्यार्थाना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर व जागृत राहून लढा तेवत ठेवण्याचा मानस संतोष जोगदंड यांनी व्यक्त केला. दरम्यान, दलित, ओबीसी, आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाची दाखल घेत सरकारने सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता इत्यादींच्या योजनेची रक्कम अनुज्ञेय असलेल्या अभ्यासक्रमांना देण्याबाबत 7 मार्च 2018 रोजी परिपत्रक काढले.या परिपत्रकात ज्यांची शाळा, महाविद्यालयात 75 % उपस्थिती असेल अशाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, असे नमूद केले आहे.
संतोष जोगदंड हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक,शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत त्यांच्या या निवडीमुळे पिंपरीचिंचवड शहर परिसरातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.