‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ पतसंस्था संरक्षण योजनेचा सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
निर्भीडसत्ता न्यूज –
लोणावळा –महाराष्ट्राला समृद्ध करायचा असेल, तर सहकाराला जोडधंदा जोडा जेणेकरून सहकारातूनच समृद्ध सहकार उभा राहील, असा विश्वास सहकार, पणन वस्त्र उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. तर, संचालक नातेवाईकांना कर्जे देतात. त्यामुळे पत संस्था गोत्यात आणतात. आमच्या सरकार विरोधी विचारांच्या बँकेत ठेवलेल्या ठेवी काढून देण्यासाठी आमच्याकडे येतात, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने किमया इन्फोटेक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागरी, ग्
यावेळी महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) शेखर चरेगावकर, आमदार बाळा भेगडे, सहकार आयुक्त सतीश सोनी, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सहकार भारतीचे महामंत्री प्रा उदय जोशी,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे , माजी आमदार दिलीप बनकर, गुलाब म्हाळकर, फेडरेशन चे महासचिव शांतीलाल सिंगि,कार्याध्यक्ष राजूदास जाधव, उप कार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव,खजिनदार दादाराव तूपकर संचालक प्रकाश पोहरे, ऍड अंजली पाटील,सीईओ सुरेखा लवांडे आदी उपस्थित होते.
यावेळी चरेगांवकर म्हणाले कि, मध्यंतरीच्या काळात सहकार क्षेत्राविषयी समाजात अविश्वास निर्माण झाला. सहकार चळवळीला गत वैभव प्राप्त करून देणे हे आव्हान आहे.यासाठी संस्कारीत कार्यकर्ते घडविण्याची गरज आहे.आपण चिंतन करून सहकार क्षेत्रात काही आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सहकार आयुक्त सोनी म्हणाले कि, राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँका पेक्षा पतसंस्था ताळागाळा पर्यंत पोचल्या.यामुळे सामान्य नागरिकाला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष फायदा झाला. महाराष्ट्राच्या विकासात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी राज्यातील पतसंस्थांच्या समस्या व मागण्यांचा पाढा वाचला. राजूदास जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार सुदर्शन भालेराव यांनी मानले.