निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे येथील शिवप्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार उधोगरत्न पुरस्कार पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तसेच ऍड अपर्णा रामतीर्थकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्याच बरोबर समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिनाचा सुद्धा सन्मान करण्यात आला. त्यात हनुमंत गायकवाड ,डॉ रवींद्र पोमण, अभिनेता सुरेश विश्वकर्मा,सचिन सातव ,अभिजित धोत्रे जन्मेजयराज भोसले ,संग्राम चौघुले,सुनील भजनावळे ,श्रीगौरी सावंत ,विजय चौधरी व डॉ हंसराज थोरात त्याचबरोबर पुणे येथील जनता वसाहत येथे कॅनल फुटून पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर वाहत्या पाण्यात अनेक महिला, जेष्ठनागरिक ,मुले अडकली होती त्यात एक मुलगा अडकला होता त्यामुलाचे प्राण एका पोलीस महिलांनी वाचवले त्या नीलम गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे ,उदय परदेशी,गणेश परदेशी,केदार पाटील,पृथ्वीराज परदेशी,जयराज परदेशी प्रदीप कांबळे,चंद्र शेखर कोरडे गिरीश घोरपडे ,नंदकुमार बोके,संदीप पांढरे यांच्यासह पराजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विजय बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद परदेशी व आनंद परदेशी यांनी आभार मानले .