निर्भीडसत्ता न्यूज –
‘फू बाई फू’ या गाजलेल्या कार्यक्रमातील अभिनेता संतोष मयेकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.
‘फू बाई फू’ या गाजलेल्या कार्यक्रमातील संतोष मयेकर यांनी साकारलेली विनोदी भूमिका विशेष गाजली. तसेच अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले. भैय्या हातपाय पसरी या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. विनोदाचे उत्तम टायमिंग असलेल्या नटांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. ‘देवाशप्पथ खोटे सांगेन’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘गलगले निघाले’, ‘आर्त’, ‘दशक्रिया’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे.