निर्भीडसत्ता न्यूज –
‘भारतीय विद्या भवन पुणे केंद्र समितीवर पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
‘भारतीय विद्या भवन’चे कार्यकारी सचिव एच.एन. दस्तूर यांनी नियुक्तीचे पत्र डॉ. देसाई यांना दिले.
‘भारतीय विद्या भवन’ ही १९३८ साली स्थापन झालेली संस्था असून भारतात ११७ केंद्र आणि जगभरात ७ शाखा आहेत. ३५५ संस्था संचलित आहेत. संस्थेची पुण्यात ‘छाब्रिया आणि परांजपे नर्सरी स्कुल असून, ‘परांजपे विद्या मंदिर’ आणि ‘सुलोचना नातू विद्या मंदिर’ विद्यालये अशा आस्थापना आहेत. २००२ साली भारत सरकारच्या वतीने गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले आहे.