निर्भीड न्यूज –
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णानगर येथे आदरांजली वाहण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, गंगाधर माडगे, प्रकाश धोंडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, अतुल हिंगे, अतुल माने, चिंतामणी परदेशी, विजय टकले, गोरख पाटिल, कैलास पाचपुते, अनिल मोरे, दिलीप पवार, मंगेश रामेकर, योगीता नागरगोजे, छाया पाटिल, जयश्री परदेशी, प्रज्ञा धोंडे, सुनिता पाचपुते, रंजना आहेर, दिपाली रामेकर आदी या वेळी उपस्थितीत होते.
या वेळी एकनाथ पवार म्हणाले की, लोकनेते मुंडे यांनी जनतेवर भरभरून प्रेम केलं, जनतेची सेवा करणारा लोकनेता आज आपल्यात नाही त्यांची उणीव सदैव आपल्याला भासत राहील.